ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड हे नेहमीच समाजाला वेगळा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करत असतात. आताही त्यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. आपली एकुलती एक मुलगी नताशा हिचा विवाह बँडबाजा, वरात असा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडला. त्यामुळे या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा मंगळवारी पार पडला. एकीकडे अनेक नेते मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्ने लावत असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी यानिमित्ताने इतर लोकप्रतिनिधींसमोर आदर्श ठेवला आहे. मुलीच्या विवाहसोहळ्यानंतर बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. २५ वर्ष आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेली मुलगी आपल्या घरात नसणार ही भावना खूप वेदनादायी आहे, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. एका बापाने, अशावेळी काय बोलायचे? असे सांगताना ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही, कारण घरात दिसणारी, बागडणारी, कधीतरी अंगावर धावून येणारी, ओरडणारी आता घरात नसणार, घरातील घरपण गेल्यासारखे असेल, अशी भावना आव्हाडांनी व्यक्त केली. जितेंद्र आव्हाडांचा जावई एलन पटेल हा त्यांची मुलगी नताशाचा बालमित्र आहे. इयत्ता पहिली पासूनच ते एकत्र शिकत होते. नताशाचे शिक्षण एमएस इन मॅनेजमेंटमध्ये झाले असून, एलन पटेलचे शिक्षण एमएस अन फायनान्स मॅनेजमेंटमध्ये झाले आहे. आव्हाडांच्या जावयाचे नाव एलन पटेल असे असून, ते स्पेनमधली मल्टीनॅशनल कंपनीत कामाला आहेत. मुलीच्या इच्छेनुसार आव्हाड यांनी हे लग्न साधेपणाने केले असून, मतदारसंघातल्या लोकांसाठी लग्नाचे रिसेप्शन ठेवले जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …