जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचे गोव्यात ग्रँड रिसेप्शन

 

पणजी – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचे लग्न मुंबईत ७ डिसेंबरला अगदी साधेपणाने करण्यात आले. कोरोनाच्या संकटात राज्यात एक चांगला आदर्श घालून दिला म्हणून आव्हाड कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुकही झाले, मात्र आता जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्यापूर्वीच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर खरेच आव्हाड यांनी मुलीचे लग्न साधेपणाने लावले की, केवळ दिखावा केला? अशा प्रकारची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. शनिवारी गोव्यातील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशाच्या लग्नाचा संगीत सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण हॉटेल बुक करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राज्यातील अनेक मंत्री, बडे कलाकार आणि परदेशातील पाहुणे उपस्थित होते. तर रविवारी होणाऱ्या रिसेप्शनसाठी बडी मंडळी उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मुलीचे साधेपणाने लग्न केल्यामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले होते. जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी नताशा आणि एलन पटेल यांचा विवाह अत्यंत साध्या रजिस्टर पद्धतीने संपन्न झाला होता. एकीकडे लाखो रुपये खर्च करून आपल्या मुला-मुलींचे विवाह सोहळे आणि दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी एकुलत्या एका मुलीचा विवाह सोहळा साध्या पद्धतीने केल्याने अनेक बड्या नेत्यांशी तुलना करण्यात आली होती, पण अशातच गोव्यातील ग्रँड रिसेप्शनचा व्हिडीओ समोर आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …