ठळक बातम्या

जावेद अख्तर यांच्या मनातील खदखद

यावर्षीचे साहित्य संमेलन हे आगामी निवडणुकीसाठी प्रचारकी असे साहित्य संमेलन आहे. तिथे साहित्यापेक्षा राजकारण आणि राजकारणात ढवळाढवळ करणाºयांचीच गर्दी झाल्याचे जाणवले. एकीकडे संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हे प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन आले नाहीत आणि राजकीय मंडळींनी हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे अखिल भारतीय राजकीय मंथन अशा प्रकारात नेऊन ठेवले. नारळीकरांना ऐकण्यासाठी आसुसलेल्या कानांना जावेद अख्तर यांची वाणी ऐकावी लागली, यांसारखे दुर्दैव ते काय म्हणायचे?, जावेद अख्तर येथे काही गीतकार किंवा कथा पटकथा संवादकार म्हणून आलेले नव्हते, तर विरोधी पक्षांचे प्रचारक म्हणून आले होते असेच भाषण त्यांनी केले.
आपल्या भाषणात सुरुवातीला मराठीची थोरवी त्यांनी ऐकवली. अगदी मुक्ताबाई या आद्य महिला कवयत्री आहेत इथंपासून ते तेंडुलकरांच्या लेखणीपर्यंत गौरव केला, पण ताकाला जाताना भांड त्यांना काही लपवता आले नाही. त्यामुळे त्यांच्या मनातील खदखद त्यांनी व्यक्त करून मोदी विरोधी लाट निर्माण करण्याचा शुभारंभाचा नारळ येथे फोडला, असेच म्हणावे लागेल. साहित्यिक आणि गीतकार, कलाकार असणाºया जावेद अख्तर यांच्या मनात जर द्वेषाची भावना असेल आणि त्याचे बीज टाकून ते साहित्य संमेलनात जात असतील, तर भविष्यातील राजकारणाची काय दिशा असेल हे समजते. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ राजकीय कारणांसाठी बाटवले हे मात्र याठिकाणी नमूद करावे लागेल.

जावेद अख्तर यांनी आपल्या भाषणात शेवटच्या टप्प्यात एक मुद्दा मांडला. तो म्हणजे १९३६ मध्ये प्रगतीशील साहित्यिक परिषद तयार झाली. तेथे अण्णाभाऊ साठे गेले होते. त्यांचे पहिले संमेलन लखनऊमध्ये झाले. तिथे प्रत्येक भाषेतील लेखक होता. प्रगतीशील साहित्यिक परिषदेत एक ठराव संमत झाला. तो ठराव होता आमची लेखणी आजपासून प्रेमकथा, फुल-ताºयांच्या गोष्टी लिहिणार नाही. आजपासून आमची लेखणी देशाच्या स्वातंत्र्याविषयी लिहील, समाजातील विषमतेवर लिहील, स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी लिहील, पण जावेद अख्तर हे विसरले की, त्यापूर्वी कितीतरी आधी आमच्या महात्मा फुलेंनी देशासाठी, शेतकºयांसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी लेखणीचा वापर केला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर आपले प्रत्येक लेखन ब्रिटिशांविरोधात वातावरण तयार करण्यासाठीच लिहिले होते. त्यांची नाटके, कविता यातून त्यांनी अगोदरपासून स्वतंत्रता देवतेला आळवले होते. जावेद अख्तर यांना १९३६ साल आठवत असेल, पण त्याच्या आधीपासून आमच्या मराठी साहित्यिकांनी ब्रिटिशांविरोधात आवाज उठवला होता. ब्रिटिशांपूर्वी आमच्याकडे मोगलाई होती. त्यावेळीही शाहिरी वाङ्मयातून जनजागृती करण्याचे काम आमच्याकडे झाले आहे. भारुडातून जनजागृती झालेली आहे. संतांचे अभंग अगदी ज्ञानदेवांचे अभंग, ज्ञानेश्वरी, समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोकांपासून सगळेच साहित्य, तुकोबारायांचे साहित्य अभंग आणि विविध संतांनी केलेल्या रचना या जनजागृतीच्याच होत्या.
मराठी भाषा कुठेही जनजागृतीसाठी कमी पडलेली नाही. चंद्र, सूर्य, तारे आणि प्रेम या सुखाच्या गोष्टी असतात तेव्हा सुचते. कठीण प्रसंगात बंडखोरीतूनच साहित्य तयार होते, ते मराठीतच झाले आहे हे अख्तर यांना काय समजणार?, पण केवळ मोदी सरकारवर घसरण्यासाठी त्यांनी हा दाखला दिला, पण त्यातून त्यांच्यातील साहित्यिक प्रगल्भता न दिसता त्याच्यातील क्रूर दुष्ट भडकावू चेहरा दिसला.

जावेद अख्तर म्हणतात, १९३६ मध्ये प्रगतीशील साहित्यिक परिषदेची जितकी गरज होती. त्यापेक्षा अधिक गरज आज आहे. खरंच हे मत पटवून सांगण्याची गरज आहे. यावर चर्चा होण्याची गरज आहे. आज शेतकºयांना भडकावून त्यांच्यापासून त्यांच्या फायद्याचे कायदे रद्द करण्याची वेळ येते, तेव्हा जावेद अख्तर यांनी एखादी कविता लिहून त्या कायद्यांचा अभ्यास करून हे कायदे तुमच्या फायद्याचे आहेत की, तोट्याचे हे सांगण्याचे काम करण्याची गरज आहे. ३७० कलम रद्द केल्याने कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग बनवला. त्याचे दु:ख त्यांना झाले नसेल तर त्यांनी सरकारच्या या निर्णयाच्या समर्थनार्थ एखादे देशभक्ती गीत लिहावे. संत ज्ञानेश्वराची भगिनी मुक्ताबार्इंवर मुक्तकंठाने स्तुती सुमने उधळणाºया जावेद अख्तर यांनी ट्रिपल तलाकचा कायदा रद्द करून मुस्लीम महिलांना न्याय देण्याच्या आणि त्यांना मुक्ता बनवण्याच्या सरकारच्या धोरणाचे कौतुक केले पाहिजे. परदेशातील, युरोपातील महिला साहित्यिकांना पुरुषांच्या नावाने लिहावे लागते असे सांगणाºया जावेद अख्तर यांनी सरकार महिलांना त्यांच्या अधिकारासाठी मदत करत असल्याची कबूल दिली पाहिजे. आज जर एखादे सरकार चांगले काम करत असेल, तर विरोधासाठी विरोध करण्यासाठी आणि धार्मिक दुस्वासाने आपल्या लेखणीचा वापर करण्याचा प्रयत्न जावेद अख्तर करत असतील, तर तो प्रकार शिंदळकी करणाºया बाईने केलेला उपदेश ठरेल.
त्यामुळेच समृद्ध संस्कृती असणाºया मराठी साहित्याचा पुरेसा अभ्यास न करता, पुरेशी माहिती न घेता केलेल्या या उपºया उथळ भाषणातून फक्त राजकीय खदखद व्यक्त केली आहे, पण त्यामुळे जावेद अख्तर यांची प्रतिमा अधिकच डागाळली आहे असेच म्हणावे लागेल. उपदेश करणारा तितकाच महान असावा लागतो. तितकाच निरपेक्ष असावा लागतो. उपदेश करणारा हा द्वेषाच्या भावनेतून बोलत नाही, पण जावेद अख्तरच्या तोंडून फक्त विषारी फुत्कार बाहेर पडत होते हेच यातून जाणवले. राजकीय प्रेरणेतून त्यांनी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मानधनाच्या अपेक्षेने हे विचार मांडले असतील कदाचित. म्हणूनच त्यांचे विचार हे अतर्क्य वाटतात.

– प्रफुल्ल फडके/ मुखशुद्धी
9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …