जायबंद सैफुद्दीनच्या जागी वेगवान गोलंदाज रुबेल हुसैनला संधी

अबुधाबी – वेगवान गोलंदाज रुबेल हुसैनला जायबंद मोहम्मद सैफुद्दीनच्या जागी टी-२० विश्वचषकात इतर उरलेल्या सामन्यात बांगलादेश संघात समाविष्ट करण्यात आले. टी-२० विश्वचषकाच्या तांत्रिक समितीने बांगलादेश व इंग्लंड यांच्यात बुधवारी पार पडलेल्या सामन्याआधी याला मान्यता दिली. सैफुद्दीन पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला, ज्यामुळे हुसैनला त्याच्या जागी घेण्यात आले. हुसैन टी-२० समवेत १५९ आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ शी निगडित क्वारंटाइन व्यवस्थेमुळे संघाला अतिरिक्त खेळाडूंसह प्रवास करण्याची परवानगी दिली होती व रुबेल ही राखीव खेळाडूच्या रूपात संघात होता. खेळाडूला बदलण्यासाठी स्पर्धेच्या तांत्रिक समितीची परवानगी घेणे गरजेचे असते. त्यानंतरच खेळाडूला अधिकृतपणे संघात समाविष्ट करता येते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …