जान्हवी कपूरचे ‘हे’ टॅलेंट पाहून रणवीरही झाला हैराण

सध्या अभिनेता रणवीर सिंग हा आपला क्वीज शो द बिग पिक्चरमुळे चर्चेत आहे. अन्य शोप्रमाणे या शोमध्ये सामान्य स्पर्धकांबरोबरच बॉलीवूड कलाकारही भाग घेताना दिसून येतात. या वेळेस द बिग पिक्चरच्या विकेंड धमाका एपिसोडमध्ये बॉलीवूडच्या दोन प्रख्यात अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर पोहोचल्या होत्या. शोमध्ये दाखल झाल्यानंतर या दोघींनी रणवीर सिंगबरोबर द बिग पिक्चरचा गेम खेळला.

यादरम्यान सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी आपले टॅलेंटही दाखवले. मुळात कलर्स टीव्हीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर द बिग पिक्चरशी निगडीत एक व्हिडीओ प्रोमो जारी केला आहे. या व्हिडीओ प्रोमोमध्ये रणवीर सिंग, सारा अली खान आणि जान्हवी कपूर हे गेम खेळताना आणि खूप मजा मस्ती करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओ प्रोमोमध्ये जान्हवीने आपले अनोखे टॅलेंटही दाखवले आहे. व्हिडीओ प्रोमोत पाहायला मिळते की, रणवीर सिंग या दोघींसोबत गेम खेळत म्हणतो की, तुम्ही दोघी माझा गेम खेळण्यास तयार आहात का? त्यानंतर तो या दोघींना एक खास चॅलेंज देतो. त्यात या दोन्ही अभिनेत्रींना आपली जीभ वाकडी करून बोलायचे असते. खरेतर थोड्या अडचणींनंतर या दोघीही वाक्य बोलण्यात यशस्वी होतात. त्यानंतर जान्हवी रणवीर कपूरला म्हणते की, हे थोडी टंग ट्विस्टद्वारे बोलले जाते. यासाठी माझ्याकडे खास टॅलेंट आहे. त्यानंतर जान्हवी आपले खास टॅलेंट दाखवत आपली जीभ पूर्णपणे फिरवते. ते पाहून रणवीरही अचंबित होतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रोमो वेगाने व्हायरल होत आहे. रणवीरव्यतिरिक्त सारा आणि जान्हवीच्या चाहत्यांनीही या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …