मुंबई – आयडियल स्पोर्ट्स ॲकॅडमी, शिवनेर व आयडियल ग्रुप आयोजित शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे स्मृती आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत जसलोक हॉस्पिटल विरुद्ध हिरानंदानी हॉस्पिटल आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटल विरुद्ध ग्लोबल हॉस्पिटल क्रिकेट संघांमध्ये १६ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क मैदानात चुरशीचे सामने होतील. चारही संघांमध्ये उदयोन्मुख खेळाडूंचा भरणा असल्यामुळे दोन्ही लढतीमधील विजयाचे पारडे दोलायमान राहील.
जसलोक हॉस्पिटल क्रिकेट संघामधील कप्तान प्रवीण मोरजकर, श्रीकांत दुधवडकर, सचिन तोडणकर, नितीन सोळंकी, सचिन दुधवडकर, दीपक रत्नापूर, पवन माहिमकर, रोहित जाधव, सुमित महागावकर, प्रसाद पाटील, भूषण कदम आदी खेळाडूंची जोरदार लढत प्रतिस्पर्धी हिरानंदानी हॉस्पिटल क्रिकेट संघाचे कर्णधार रुपेंद्र माने, तुषार राणे, यष्टीरक्षक शंकर पंडीधर, निखील काळे, प्रशांत देसाई, तृशाल गिरमकर, सचिन कुडतरकर, सोनू पिल्ले, दिनेश सोळंकी, सुनील पांडे, दुर्गाप्रताप जैस्वार आदी खेळाडूंमध्ये होईल. ग्लोबल हॉस्पिटल विरुद्धचे आव्हान पेलण्यासाठी कृपाल पटेलच्या नेतृत्वाखाली हर्षद जाधव, विप्लोव जाधव, परीक्षित ठाकरे, अमोल तोरस्कर, लव यादव, संजय कुपटे, विशाल सावंत, कुलदीप म्हात्रे, अफझल शेख, सुशील कदम आदी खेळाडूंचा सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहे. ग्लोबल हॉस्पिटल संघात कर्णधार निलेश देशमुख, दयानंद पाटील, महेश गोविलकर, कपिल घमरे, विराज साळवी, अभिनंद घाडीगावकर, सुनील कदम, आशिष जाधव, अतुल आळवे, योगेश परब, सुनील सकपाळ आदी खेळाडूंचा समावेश असेल.