जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर

  •  सेनेला उपाध्यक्षपदाची संधी

जळगाव – जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद कुणाला मिळणार याची उत्सुकता अखेर संपली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्या गळ्यात जळगाव जिल्ह­ा बँक अध्यक्षपदाची माळ पडली, तर शिवसेनेला उपाध्यक्षपद देण्यात आले. अशाप्रकारे श्याम सोनवणे हे उपाध्यक्ष होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी चेअरमनपदासाठी गुलाबराव देवकर यांना तर शिवसेनेकडून उपाध्यक्षपदासाठी श्याम सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तब्बल एक ते दीड महिन्यांपासून जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. शुक्रवारी जिल्हा बँकेत पहिल्या ३ वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर यांना संधी देण्यात आली आहे, तर शिवसेनेने श्याम सोनवणे यांची निवड केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ जागांपैकी २० जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली होती. यानंतर शुक्रवारी अजिंठा विश्रामगृहात महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी फॉर्म्युला ठरविण्यात आला होता. यात राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी उमेदवार ठरविण्याचा अधिकार वरिष्ठ पातळीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना देण्यात आले होते. तब्बल तासभर खडसे यांच्यासह संचालकांच्या झालेल्या बंद दाराआड बैठकीत पहिल्या ३ वर्षांसाठी अध्यक्षपदाची माळ गुलाबराव देवकर यांच्या गळ्यात पडली, तर सेनेकडून पुढील २ वर्षांसाठी उपाध्यक्षपदी श्याम सोनवणे राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्यासह इतर संचालक जिल्हा बँकेत दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्या ३ वर्षांसाठी अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पुढील २ वर्षांसाठी नवा अध्यक्ष निवडण्यात येईल.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …