नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरच्या शोपियान भागात शनिवारी जवानांनी लष्कर-ए-तैबा या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. चकमक झालेल्या ठिकाणाहून शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला आहे. शनिवारी पहाटे चकमकीस सुरुवात झाली. या चकमकीत ठार झालेले दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैबा संघटनेचे होते आणि त्यांची ओळख पटली असून, त्यातील एक बारीपोरा येथील सज्जाद अहमद होता आणि दुसरा पुलवामा येथील राजा बासित नजीर असल्याची माहिती समोर येत आहे.
शोपियानच्या चौगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैबाचे दोन दहशतवादी ठार झाले. यातील एक दहशतवादी ग्रेनेड हल्ला, गोळीबार आणि नागरिकांच्या हत्येत सहभागी होता, तर दुसरा दहशतवादी हा नुकताच संघटनेत सामील झाला होता, अशी माहिती काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर जवानांनी शनिवारी पहाटेच संबंधित ठिकाणी शोध मोहीम सुरू केली होती. त्यानंतर जवांनाची चाहूल लागताच या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात जवानांकडून झालेल्या गोळीबारात दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …