जम्मू-काश्मीर : बस दरीत कोसळून ११ ठार

१४ जखमी; सात जणांची प्रकृती चिंताजनक
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे एक बस दरीत पडल्याने ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या १४ जणांपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच मदत करण्यासाठी बचाव पथक आणि भारतीय लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरवरून या अपघातामध्ये मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत दु:ख व्यक्त केले आहे. जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे झालेल्या अपघाताबद्दल ऐकून वाईट वाटले. या अपघातामध्ये मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी मी शोक व्यक्त करतो, असे शहा म्हणाले आहेत, तसेच त्यांनी जखमींना लवकर आराम मिळावा यासाठी प्रार्थनाही केली आहे. या अपघातासंदर्भात आपण जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा केली असून, शक्य ती सर्व मदत केली जाईल आणि जखमींवर उपचार केले जातील, असा शब्द केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिला आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …