जम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये पुन्हा चकमक

  • ‘जैश’च्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले. पुलवामामध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत एका पाकिस्तानी नागरिकासह तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ठार झालेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे सदस्य होते. या दहशतवाद्यांकडून शस्त्रे, स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
काश्मीरमधील पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. त्यामध्ये एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. त्यांच्याजवळून दोन एम-४ कार्बाइन्स आणि एक एके-४७ रायफल आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदगाम गावामध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यावेळी दहशतवादी असलेल्या ठिकाणाला घेरण्यात आले. दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. अखेर चकमकीमध्ये तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्याआधी मंगळवारी ४ जानेवारी रोजी, श्रीनगरमधील हरवनमध्ये लष्कर-ए-तैबाशी संबंधित असलेल्या एका कुख्यात दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले होते. सलीम पर्रे असे या दहशतवाद्याचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीच्या वेळी पाकिस्तानी दहशतवादी हाफिज हा फरार झाला. हाफिज उर्फ हमजा याच्यावर बांदिपोरामध्ये दोन पोलिसांची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याशिवाय इतरही दहशतवादी कारवायांमध्ये तो गुंतला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …