जम्मू-काश्मीर खोºयात अद्याप १९९ दहशतवादी सक्रिय

यावर्षी १५१ दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. सध्या काश्मीर खोºयात सुमारे १९९ दहशतवादी सक्रिय आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलानं यासंदर्भातली माहिती दिली आहे. यातील ११० दहशतवादी स्थानिक, तर ८९ परदेशी आहेत. काश्मीर खोºयाशी संबंधित अनेक गुप्तचर संस्थांच्या अहवालाचा हवाला देत एका वरिष्ठ अधिकाºयानं सांगितलं की, खोºयात एकूण १९९ दहशतवादी सक्रिय आहेत.

यावर्षी २४ नोव्हेंबरपर्यंत, खोºयात जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि लष्करासोबत झालेल्या चकमकीत १४८ दहशतवादी मारले गेले आहेत. त्यापैकी १२७ स्थानिक, तर २१ परदेशी आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. खोºयात सुमारे ६५ हजार जवान तैनात आहेत. याशिवाय खोºयातील नागरिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर सीआरपीएफच्या अतिरिक्त २५ कंपन्याही तेथे तैनात करण्यात आल्या आहेत.
यावर्षी दहशतवाद्यांशी लढताना एकूण ११ सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत. गेल्या सात दिवसांत एकूण २७ डाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. यामध्ये छत्तीसगडमधून १३, बिहारमधून ३ आणि झारखंडमधून ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये बुधवारी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत ‘द रेझिस्टन्स फ्रंट’च्या टॉप कमांडरसह तीन दहशतवादी ठार झाले. बुधवारी संध्याकाळी रामबाग परिसरात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी ट्विट केले की, पोलिसांनी श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार केले. मारले गेलेले दहशतवादी आणि ते कोणत्या संघटनेशी संबंधित होते, याची ओळख पटवली जात आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव कमांडर मेहरान यासीन शाला असे आहे. जो श्रीनगरमधील नागरिकांच्या हत्येत सहभागी होता. त्याचा मृत्यू हा श्रीनगरमधील दहशतवाद्यांना मोठा धक्का आहे. या घटनेनंतर श्रीनगरच्या विविध भागांतून बंद आणि निदर्शने केल्याच्या बातम्या येत आहेत.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …