ठळक बातम्या

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग आणि कुलगाममध्ये एन्काऊंटर

२ पाकिस्तानींसह जैशच्या ६ दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या एन्काऊंटरमध्ये ६ दहशतवादी मारले गेले. हे सर्व दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदसंबंधित होते. आतापर्यंत ४ दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. ज्यामध्ये २ पाकिस्तानी आणि २ स्थानिक आहेत. काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, गोळीबारात लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस जखमी झाला आहे. उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला. उर्वरितांची प्रकृती स्थिर आहे.
विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममध्ये एका सूचनेवरून पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना घेरल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. येथे जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या परिसरात आणखी एक दहशतवादी लपल्याचा संशय आहे. सध्या शोध मोहीम सुरू आहे. शोपियानमध्ये मारले गेलेले दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैबाशी संबंधित होते. घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. शोपियानच्या चौगाम भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर जवानांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …