ठळक बातम्या

जगातील सर्वात तरुण आईने वयाच्या ५व्या वर्षी मुलाला दिला होता जन्म

जगात खूप मोठमोठे आश्चर्यकारक आणि विचित्र रेकॉडर््स आहेत, ज्याबद्दल जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. असाच एक विक्रम लीना मेदिनाच्या नावावर आहे. वयाच्या ५व्या वर्षी ती आई झाली होती, म्हणजेच वयाच्या ५व्या वर्षी तिने मुलाला जन्म दिला. हे ऐकल्यानंतर बºयाच जणांचा विश्वास बसणार नाही; पण हे अगदी खरे आहे.
जेव्हा लीना मेडिना ५ वर्षे ७ महिने आणि १७ दिवसांची होती, तेव्हा तिने आपल्या मुलाला जन्म दिला. हा विक्रम आजही पेरू या दक्षिण अमेरिकन देशात राहणाºया लीना मेडिना यांच्या नावावर आहे. लीनाचा जन्म २७ सप्टेंबर, १९३३ रोजी पेरूमधील टिक्रापो येथे झाला. ती पाच वर्षांची असताना, तिला मुलगा झाला. पाच वर्षांची मुलगी मुलाला जन्म कशी देऊ शकते हे पाहून अवघ्या जगाला धक्का बसला होता.

असे म्हटले जाते की, लीना ५ वर्षांची असताना, तिचे पोट अचानक मोठे होऊ लागले. सुरुवातीला हा ट्युमर किंवा सामान्य आजार असेल, असे कुटुंबीयांना वाटले. यामुळे घरच्यांनी लीनाला डॉक्टरांकडे नेले. तपासादरम्यान डॉक्टरांना आढळले की, लीना मेडिना गर्भवती असून, ती एका मुलाला जन्म देणार आहे.
या तपासणीनंतर डॉक्टरही हैराण झाले. त्यानंतर डॉक्टरांच्या टीमने लीनाला हॉस्पिटलमध्ये त्यांच्या देखरेखीखाली ठेवले. त्यानंतर १४ मे, १९३९ रोजी लीना मेडिना यांनी मुलाला जन्म दिला. ज्यासाठी डॉक्टरांना लीनाचे आॅपरेशन करावे लागले. रिपोर्ट्सनुसार लीनाने ज्या मुलाला जन्म दिला ते बाळही सदृढ, निरोगी होते. योगायोगाने ज्या दिवशी लीना मेडिनाने मुलाला जन्म दिला.

त्या दिवशी देशात मातृदिन साजरा करण्यात आला; पण इतक्या कमी वयात लीना आई कशी झाली, या प्रश्नाचे उत्तर आजतागायत मिळालेले नाही. या प्रश्नाचे उत्तर आजपर्यंत वैद्यकीय शास्त्राच्या संशोधनातून मिळालेले नाही. लीनाचे ते मूल ४० वर्षे जगले. एका मुलाला जन्म देणाºया लीनाचे १९७२ साली लग्न झाले. त्यानंतर तिने नर्सच्या नोकरीत आपला वेळ घालवला.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …