ठळक बातम्या

जगातील सर्वात जुन्या स्टॅम्पचा ६२ कोटींना होणार लिलाव

जगातील पहिल्या पोस्टल स्टॅम्पचा लिलाव होत आहे. हा शिक्का १८४० मध्ये वापरण्यात आला होता. आता त्याचा लिलाव होत आहे. सुमारे ६२ कोटी रुपयांना तो विकत घेतले जाण्याची शक्यता आहे.
जगात लोकांना अनेक प्रकारचे छंद असलेले पाहायला मिळतात. काही लोकांना जुनी नाणी आणि नोटा जमा करण्याचा शौक असतो. त्याचबरोबर काही जणांना स्टॅम्प गोळा करण्याचा छंद असतो. मुद्रांक गोळा करणा‍रे त्यांच्या संग्रहात जुने स्टॅम्प जमा करण्यासाठी त्याच्याकडे जे काही आहे, ते पैसे खर्च करायला मागेपुढे पाहत नाही. आता जगातील सर्वात जुन्या स्टॅम्पचा लिलाव होणार आहे आणि त्याची किंमत ६२ कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.

जगातील या सर्वात जुन्या स्टॅम्पचे नाव पेनी ब्लॅक आहे. हा प्रथम १८४०मध्ये पोस्टल पत्रावर वापरला गेला. त्याची बोली ६२ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. लिलाव कंपनी सोथेबीच्या मते, हा आतापर्यंत सापडलेला सर्वात जुना स्टॅम्प आहे. त्यात राणी व्हिक्टोरियाचे चित्र आहे. १० एप्रिल १८४० ही तारीख ज्या दस्तऐवजातून काढली गेली होती ती त्यामध्ये होती. हे पत्र एका स्कॉटिश राजकारण्याकडून जप्त करण्यात आले आहे. त्यावर हा शिक्का लावण्यात आला होता.
असे म्हणतात की, जगात पेनी ब्लॅकचे तीन शिक्के बनवले गेले. त्यापैकी एकाचा यावेळी लिलाव होत आहे. सोथेबीच्या ट्रेझर सेलचे प्रमुख हेन्री हाऊस यांनी सांगितले की, इतकी वर्षे जतन केलेले हे पहिलेच तिकीट आहे. जगात आजवर अनेक नवीन आणि जुनी तिकिटे सापडली असली, तरी हा सर्वात जुना पोस्टल स्टॅम्प आहे. जगातील अनेक प्रसिद्ध लोकांना असे जुने स्टॅम्प खरेदी करण्याचा छंद आहे. अशा परिस्थितीत त्याची किंमत ६२ कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

तीन वर्षे या स्टॅम्पवर संशोधन केल्यानंतर त्याच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. हा शिक्का ७ डिसेंबर रोजी लिलावासाठी ठेवण्यात येणार आहे. याआधी राणी व्हिक्टोरियाच्या सुमारे ६८ दशलक्ष स्टॅम्पचा लिलाव झाला आहे. यामध्ये राणीचे स्केच तयार केले होते. अशा परिस्थितीत आता हा दुर्मीळ शिक्का चर्चेत आला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …