जगभरात ओमिक्रॉनचे दीड लाख रुग्ण, तर २६ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली – जगातील १०८ देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन पसरला आहे. एवढेच नाही तर आतापर्यंत थोडे थोडके नव्हे दीड लाखावर रुग्ण समोर आले आहेत, तर २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती भारतीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडून महिना झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, जगभरात १०८ देशांमध्ये १.५१ लाखाहून अधिक ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत, तर २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटन, अमेरिका, डेन्मार्क, नॉर्वे, कॅनडा, जर्मनी, साऊथ आफ्रिकामध्ये सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. ओमिक्रॉन किती खतरनाक आहे, याची डब्ल्यूएचओने तीन कारणे सांगितली आहेत. पहिले कारण म्हणजे जागतिक स्तरावर रुग्णांची संख्या खूप आहे. दुसरे असे की इम्यून एस्केपची संभाव्यता देखील जास्त आहे. याशिवाय ओमिक्रॉन जास्त संक्रमक देखील आहे, असे भूषण म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …