जगभरात ओमिक्रॉनचा कहर

बाधितांच्या संख्येत ११ टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली – देशात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखीनच भर पडत आहे. मागील एका आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत तब्बल ११ टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनबाबत इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने धोका कायम असल्याचे सांगितले आहे.
ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या देशांत डेल्टापेक्षा ओमिक्रॉन बाधितांची संख्या अधिक आहे, त्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या साप्ताहिक माहितीत म्हटले की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनबाबतचा धोका अजूनही अधिक आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक फैलावत असून, अवघ्या दोन ते तीन दिवसांत ही रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. या वेगामुळे अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या देशांमध्ये ब्रिटन आणि अमेरिकेचाही समावेश आहे.
ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे. समोर आलेल्या डेटानुसार, ओमिक्रॉन हा डेल्टा व्हेरिएंटहूनही अत्यंत वेगाने पसरत असल्याचे आणि केवळ दोन ते तीन दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेत कोरोना बाधितांच्या संख्येत २९ टक्क्यांनी घट झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा २४ नोव्हेंबर रोजी ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळला होता. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि डेन्मार्कमधील आकडेवारीनुसार डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनची बाधा झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता कमी आहे. चीनमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे २०० रुग्ण आढळले आहेत. मागील २० महिन्यांतील ही सर्वाधिक रुग्णवाढ असल्याचे बोलले जात आहे. शांक्सी प्रांताची राजधानी शिआनमध्ये गेल्या २४ तासांत १५० रुग्णांची नोंद करण्यात आली.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …