जंगलात सापडले नवजात बाळ

पालक नवजात मुलांची विशेष काळजी घेतात. कल्पना करा की, नुकतेच जन्मलेल्या मुलाला कुणीतरी जंगलात टाकले आहे आणि ते २ दिवस जंगलात एकटे पडून आहे, तर त्याची काय अवस्था होईल? थायलंडच्या जंगलात एका नवजात मुलीसोबतही असेच घडले, जेव्हा ती मुलगी रेस्क्यू टीमला जंगलात सापडली तेव्हा तिची अवस्था खूपच वाईट होती.
लहान मुलांच्या जन्मानंतर त्यांची एवढी काळजी घेतली जाते की, प्रत्येक वेळी घरातील काही सदस्य त्यांच्यासोबत असतो. थायलंडमध्ये एका नवजात अर्भकाचा जन्म होताच, अज्ञात निदर्य लोकांनी तिला घनदाट जंगलात टाकून दिले. त्यानंतर तब्बल ४८ तास या बाळाला संघर्ष करावा लागला. मुलगी जंगलात एकटी होती, इथे साप आणि अजगरांची छावणी आहे.

येथील वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, ही घटना थायलंडच्या कराबी प्रांतातील आहे. मुलगी गेल्या २ दिवसांपासून जंगलात होती आणि तिच्यासोबत कोणीही नव्हते. जंगलात धोकादायक प्राण्यांबरोबरच विषारी साप आणि अजगरही वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. जंगलात रबर गोळा करण्यासाठी गेलेल्या काही लोकांनी मुलीला पाहिले असता तिला वाचवता आले.
मुलगी दिसली तेव्हा ती केळीच्या झाडांच्या मधोमध पडली होती. नवजात मुलीच्या चेहºयावर ओरखडे उमटले होते आणि तिच्या शरीरावर किडे रेंगाळत होते. या अवस्थेत मुलगी बराच वेळ तिथे पडून होती. मुलीवर अंगभर किडे रेंगाळत होते आणि रबर गोळा करायला गेलेल्या लोकांनी तिला उचलताच ती जोरजोरात रडू लागली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. मुलीला प्रचंड डिहायड्रेट केले होते. सध्या ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …