बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने आजवर बॉलीवूडबरोबरच तेलगू आणि पंजाबी चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले आहे. रकुलने आपल्या करीअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनयासोबतच रकुल आपल्या परफेक्ट स्टाईलसाठीही ओळखली जाते. इतकेच नव्हे तर चाहते रकुलची स्टाईल कॉपी करतानाही दिसून येतात. परंतु नुकतीच रकुलप्रीत कॅमेऱ्यासमोर उप्स मोमेंटची शिकार ठरली आहे. फॅशनिस्टा रकुलला अशा पद्धतीने उप्स मोमेंटची शिकार होताना पाहून सोशल मिडियावर तिच्या चाहत्यांनी तिचा चांगलाच क्लास घेतला आहे.
फिल्म इंडस्ट्रीत नेहमीच स्टार्स सोबत वॉडरोब मालफंक्शनच्या घटना घडताना दिसून येतात. रकुलसोबतही असेच काहीतरी झाले. आपला आगामी चित्रपट दे दे प्यार दे चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रकुलला या ऑकवर्ड सिच्युएशनला तोंड द्यावे लागले. रकुल अतिशय छोटा असा गुलाबी रंगाचा स्कर्ट घातला होता. जेव्हा ती या ड्रेसमध्ये खुर्चीवर बसली तेव्हा तिचा ड्रेस बऱ्याच प्रमाणात वर सरकला होता हे कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून येतेयं. या इव्हेंटचे फोटो जेव्हा व्हायरल झाले तेव्हा तिचे चाहते चांगलेच भडकले व त्यांनी तिला ट्रोल करण्याबरोबरच योग्य प्रकारे बसण्याचा सल्लाही दिला.