छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी

  •  संदीप देशपांडेंचा थेट कानडीतून इशारा

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा मनसेनेही तीव्र निषेध नोंदवला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी तर थेट कानडीतूनच कर्नाटक सरकारला इशारा दिला. छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी, (मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापिही सहन करणार नाही) असा इशाराच संदीप देशपांडे यांनी कानडी सरकारला दिला.
संदीप देशपांडे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना हा इशारा दिला. निम्म वडागीन राजकारणे द सलवागी, छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी, अदन्न नाव यावागलो, सहस्सोदिला, मानंगिला न्यूतुळकळी, असा इशाराच देशपांडे यांनी कानडीतून दिला आहे. म्हणजे महाराजांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही. हे त्यांनी समजून घ्यावे. कर्नाटकमध्ये दोन पक्षांचे जे अंतर्गत राजकारण सुरू आहे. त्याअंतर्गत राजकारणात महाराजांचा झालेला अपमान मराठी माणूस कधीही सहन करणार नाही हे लक्षात ठेवा, असा याचा अर्थ होतो. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाणीवर कंट्रोल ठेवावा अन्यथा मनसे त्यांच्यावर कंट्रोल ठेवेल, असा इशाराही देशपांडे यांनी दिला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …