छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील २२ कर्मचाऱ्यांना कोरोना

मुंबई – राज्यात कोरोनासह ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असतानाच लोकप्रतिनिधीही त्यातून सुटले नाहीत. आता तर त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील २२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
छगन भुजबळ यांच्या मुंबईतील रामटेक या निवासस्थानी असलेल्या एकूण २२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. रामटेकवर गेली दोन दिवस कोरोनाची तपासणी हाती घेण्यात आली आहे. प्रथम रामटेकवर ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आणखी ११ असे एकूण २२ कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. अजूनही या निवासस्थानातील इतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या घेण्यात येत आहेत, तर चाचण्या घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे अहवाल येणे बाकी असून, रामटेकमधील बाधितांची संख्या वाढू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …