चोविस तासात देशात २३,५२९ नव्या रुग्णांची भर

नवी दिल्ली: गेल्या साधारण दीड वर्षांपासून जगभरात थैमान घालणाºया करोना विषाणूने भारतीयांच्या तोंडचंही पाणी पळवलं आहे. मात्र या विषाणूशी लढण्यासाठी भारतासह जगानेच लसींचा उपायही शोधून काढला आहे. या करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याचं आकडेवारी जरी सांगत असली तरी करोना प्रतिबंधक नियमावलीचं स्वयंप्रेरणेनं पालन करणं आवश्यक आहे.

गेल्या २४ तासांत देशामध्ये २३ हजार ५२९ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या २ लाख ७७ हजार ०२० झाली आहे. आत्तापर्यंत देशातल्या तीन कोटी ३७ लाख ३९ हजार ९८० नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत २८ हजार ७१८ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता तीन कोटी ३० लाख १४ हजार ८९८ वर पोहोचली आहे. दिवसभरात देशात ३११ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे मृतांचा आकडा आता चार लाख ४८ हजार ०६२ वर पोहोचला आहे.
तर गेल्या २४ तासांत ६५ हजार ३४ लाख ३०६ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यामुळे देशातल्या लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या ८८ कोटी ३४ लाख ७० हजार ५७८ झाली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *