चेन्नईत मुसळधार पाऊस : नागरिकांना सतर्कतेचा इशारा; रस्त्यांना नद्यांचे रूप

चेन्नई – तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. चेन्नई आणि उपनगरांत रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच दोन धरणांमधून पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे अधिकाऱ्यांनी रविवारी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे चेन्नईतील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नई शहराला पाणीपुरवठा करणारे चेम्बरमबक्कम आणि पुझल तलाव मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत आहेत.
प्रशासनाने चेन्नईतील नागरिकांना पुराचा इशारा दिला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी कांचीपूरम आणि तिरुवल्लूर या भागांतील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये २०१५ नंतर इतका मुसळधार पाऊस पहिल्यांदाच पडतोय. चेन्नई, कांचीपूरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांतील अनेक उपनगरांमध्ये शनिवारी सकाळपासून अधूनमधून पाऊस पडला आणि रात्रभर सुरू राहिल्याने अनेक भागांत पूर आला, त्यामुळे लोकांची गैरसोय झाली. चेन्नईतील कोरातूर, पेरांबूर, पोरूर, पूनमल्ले, कोडंबक्कम, अण्णा सलाई, टी. नगर, अडयार, पेरुंगुडी आणि ओएमआर या भागांतही पावसामुळे पाणी साचले आहे. रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत चेन्नईत २०७ मिमी पाऊस झाला होता. नुंगमबक्कममध्ये १४५ मिमी, विलिवक्कममध्ये १६२ मिमी आणि पुझलमध्ये १११ मिमी पाऊस झाला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …