चीनमध्ये लोक मुलांना देत आहेत कोंबडीच्या रक्ताचे इंजेक्शन

 

चीनचे लोक त्यांच्या विचित्र खाण्यापिण्यासाठी जगभरात ओळखले जातात. चायनीज काहीही खाऊ शकतात असे म्हणतात. आता चीनमध्ये एक प्रकरण समोर आले आहे, ज्याची जगभरात चर्चा होत आहे. येथे लोक लहान मुलांना कोंबडीच्या रक्ताचे इंजेक्शन देत आहेत. हे जाणून तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे पूर्णपणे सत्य आहे. चला जाणून घेऊया चीनमध्ये लोक असे का करतात?

चीनमध्ये लोक लहान मुलांना कोंबडीच्या रक्ताची इंजेक्शने देत आहेत, जेणेकरून मुलांच्या आरोग्याच्या समस्या दूर व्हाव्यात. चीनमध्ये मुलांना सुपर किड्स बनवण्याच्या नावाखाली पालक हे विचित्र कृत्य करत आहेत. हे जाणून तुम्हाला विचित्र वाटले असेल, पण हा गेम चीनमध्ये अनेक दिवसांपासून सुरू आहे.
एका मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, चीनमधील पालक मुलांचे शरीर चपळ बनवण्यासाठी कोंबडीच्या रक्ताचे इंजेक्शन देत आहेत. याशिवाय यामुळे लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या संपत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. कोंबडीच्या रक्ताच्या इंजेक्शनबाबत अनेक दावे केले जात आहेत.

ही इंजेक्शन्स घेतल्यावर कॅन्सर आणि टक्कल पडण्याच्या समस्येवर मात करता येऊ शकते, असे या अहवालात म्हटले आहे. यासोबतच कोंबडीच्या रक्तात स्टेरॉइड्स आढळतात, ज्यामुळे मुले अभ्यास आणि खेळात वेगवान होतात. चीनमध्ये मुलांना सुपर किड्स बनवता यावे यासाठी मुलांना कोंबडीचे रक्त टोचून देण्याची स्पर्धा सुरू आहे.
त्यामुळे चीनमध्ये चिकन बेबीची क्रेझ वाढू लागली आहे. एकमेकांचे पाहून इतर पालकही असं करत आहेत, जेणेकरून आपल्या पाल्यानेही पुढे जावं. एका अहवालानुसार चिनी मुलांचे डोळे कमकुवत असतात. सुमारे ७१ टक्के मध्यम शालेय मुले आणि सुमारे ८१ टक्के उच्च माध्यमिक मुलांची दृष्टी खराब आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …