ठळक बातम्या

चित्रपटांतून देशाची संस्कृती योग्यप्रकारे सादर करण्याची माझी जबाबदारी – गुलशन ग्रोव्हर

प्रदीर्घ काळापासून हिंदी सिनेमांमध्ये बॅडमॅन या नावाने ओळखले जाणारे प्रख्यात अभिनेता गुलशन ग्रोव्हर यांचे अनेक प्रोजेक्ट एका पाठोपाठ एक समोर आले आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपट सूर्यवंशी, त्यानंतर अमोल पराशर अभिनीत फिल्म कॅश आणि आता अलीकडेच आलेली वेब सीरिज युवर ऑनर-२ द्वारे त्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवरही पाऊल ठेवले आहे. येत्या काळात ते इंडियन-२ आणि नो मिन्स नो या चित्रपटांमध्येही दिसून येणार आहेत. या प्रोजेक्टमध्ये त्यांनी निगेटिव्ह बरोबरच काही पॉझिटीव्ह व्यक्तिरेखाही साकारल्या आहेत.

आता जे स्टारडम मिळत आहे ते पूर्वीच्या तुलनेत किती वेगळे आहे, अशी विचारणा गुलशन ग्रोव्हर यांना केली असता ते म्हणाले, या काळात जेव्हा आपली जागा निर्माण करणे लोकांकरिता मुश्कील आहे तेथे मला वेगवेगळ्या प्रकारच्या मनोरंजक व्यक्तिरेखा मिळत आहेत. स्टारडमची अवस्था काहीशी अशी आहे की, अलीकडेच मी सूर्यवंशी चित्रपट पाहायला चित्रपटगृहात गेलो होतो, तेथे इतकी गर्दी उसळली की, सिक्युरिटीने मला चित्रपट पाहू न देता कारमध्ये बसवून घरी पाठवले. असे स्टारडम मी यापूर्वी पाहिले नव्हते.
वेगवेगळ्या पिढीतील कलाकारांबरोबर काम करताना आपल्याला आपल्या अभिनय शैलीतही बदल करावे लागतात का?, या प्रश्नाला उत्तर देताना गुलशनजी म्हणाले, शंभर टक्के बदल करावा लागतो. प्रत्येक चित्रपटाचा आपला एक थाट असतो. ज्याप्रकारचे डायलॉग मी सूर्यवंशीमध्ये बोलले आहेत, तसे डायलॉग मी कॅश किंवा युवर ऑनर-२ मध्ये म्हटलेले नाहीत. तरुणांकडून खूप काही शिकायला मिळत आहे.

दरम्यान, दोन भिन्न संस्कृती जेव्हा एका चित्रपटात एकत्र येतात, तेव्हा भारतीय कलाकार म्हणून आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, असा प्रश्न केला असता गुलशनजी म्हणाले, आम्हाला आमच्या परफॉर्मन्समध्ये बॅलेन्स ठेवावा लागतो. कारण हिंदी चित्रपटांमध्ये आम्ही थोडी लाऊड ॲक्टिंग करतो. विदेशी चित्रपटात आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड प्रमाणे जावे लागते. मी ज्या देश आणि संस्कृतीला प्रेझेंट करतो ते योग्यप्रकारे सादर करणे माझी जबाबदारी ठरते. माझ्या वागण्यात संस्कृतीची झलक दिसली पाहिजे. जर मी कुठे चप्पल घालून उभा राहत नसेल, तर तो आपल्या संस्कृतीचा आदर आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …