चाहत्यांना लग्नाच्या दिवशी ओम आणि स्वीटूने दिला सुखद धक्का

झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली आणि लोकप्रियतेचे शिखर गाठले. या मालिकेतील प्रमुख जोडी ओम आणि स्वीटू ही तर प्रेक्षकांची आवडती आहे. या दोघांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत, असे म्हटले तर खोटे ठरणार नाही. या दोघांचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. मालिकेत नुकतेच ओम आणि स्वीटू यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. अखेर ओम आणि स्वीटू एकत्र आले आणि याचा आनंद प्रेक्षक आणि चाहत्यांना देखील झाला. हा आनंद एका अनोख्या पद्धतीने ओम आणि स्वीटू यांनी आपल्या चाहत्यांसोबत साजरा केला.
ओम आणि स्वीटू यांनी १९ डिसेंबर रोजी ज्या जोडप्यांची लग्न आहेत त्यांनी त्यांची विवाह पत्रिका सोशल मीडियावर पाठवायचे आवाहन केले आणि त्यातील एका जोडीच्या लग्नात उपस्थिती दर्शवण्याचे प्रॉमिस केले. त्यांनी केलेल्या प्रॉमिस प्रमाणेच प्रेक्षक-चाहते सौरभ आणि जुही यांच्या लग्नात ओम आणि स्वीटू यांनी हजेरी लावली आणि या नवदाम्पत्याला त्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांना आपल्या लग्नात पाहून या जोडप्याला सुखद धक्काच बसला आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांची ती प्रतिक्रिया आणि ओम स्वीटू सोबत त्यांचा एक झकास फोटो सोशल मीडियावर कलाकारांनी शेअर केला. चाहते आणि कलाकार यांच्यातील नाते अजून घट्ट करण्याचा ओम आणि स्वीटू यांचा हा प्रयत्न नक्कीच उल्लेखनीय होता, असे म्हटले तर खोटे ठरणार नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …