बॉलीवूड तसेच टीव्ही जगतामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेली अभिनेत्री विद्या मालवदे आजही आपल्या बोल्डनेसने भल्याभल्या अभिनेत्रींवर मात करते. विद्या सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह असून, ती आता योग गुरू बनली आहे.
विद्या केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात योगाचे वर्कशॉप्स घेत असते. त्याचबरोबर विद्या काही शॉर्टफिल्म्समध्येही दिसून आली आहे. विद्याने २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या चक दे इंडियाद्वारे लोकप्रियता मिळवली होती. चित्रपटांव्यतिरिक्त विद्याने अनेक टीव्ही शोजमध्येही काम केले आहे. ती फॅमिली नंबर १, फिअर फॅक्टर तसेच डर सबको लगता हैं यांसारख्या टीव्ही शोजमध्ये दिसून आली आहे. विद्याचा विवाह २००२ मध्ये अरविंद सिंग बग्गा यांच्याबरोबर झाला होता, परंतु त्यांच्या मृत्युनंतर विद्याने संजय डायमाबरोबर विवाह केला, जो आशुतोष गोवारीकर यांचा चित्रपट लगानचा स्क्रिनप्ले रायटर आणि असोसिएट डायरेक्टर होता.