ठळक बातम्या

चंदीगढ करे आशिकीतील आपल्या व्यक्तिरेखेबाबत वाणी उत्साहित

चंदीगढ करे आशिकीला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे या चित्रपटाने पहिल्याच विकेंडमध्ये १४.५३ कोटींचा गल्ला गोळा केला आहे. चित्रपटाचे कलेक्शन शुक्रवारनंतर रविवारपर्यंत सातत्याने वाढत गेले. त्यामुळे हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात आपल्या गुंतवणूकीचा खर्च वसूल करणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या चित्रपटातील मानवीच्या आपल्या भूमिकेबाबत वाणी कपूर ही कमालीची उत्साहित दिसून येते. प्रदीर्घ काळानंतर हिंदी सिनेमातील अभिनेत्री अशा प्रकारची आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसून आली आहे.
वाणी म्हणते, जेव्हा या चित्रपटाची पटकथा माझ्याकडे आली, तेव्हा मी आश्चर्यचकित आणि रोमांचित झाले होते. या पटकथेतून चित्रपटाची कथा अतिशय आकर्षकपणे मांडण्यात आली होती. एका वेगळ्या विषयावर चित्रपट बनवणे खूप हिंमतीचे काम आहे आणि मला आनंद आहे की या प्रयत्नांमध्ये आम्ही दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्याबरोबर आहोत. अशा चित्रपट निर्मितीद्वारे आपण समाजाला पुढे नेऊ शकतो आणि अशा चित्रपटांद्वारेच आपल्याला व्यापक रूपात समाज बदलण्यास मदत मिळते.

वाणी पुढे म्हणाली, अशा चित्रपटांचे यश निर्मात्यांचे मनोबळ वाढवते. आपण लाख म्हणू की सिनेमा प्रगतशील का होत नाहीयं?, परंतु जोपर्यंत अशा मनोरंजक कथा बनत नाहीत आणि लोक त्या पाहत नाहीत तोपर्यंत बदल खूप कठीण आहे. चंदीगढ करे आशिकीने एक नवीन सुरुवात केली आहे. मला वाटते की, या चित्रपटाच्या यशाने त्या असंख्य लोकांनाही अशा व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्याची हिंमत मिळेल ज्यांनी आपल्या फिलींग्ज आणि आपल्या शारीरिक बनावटीनुसार लिंग परिवर्तन करून घेतले आहे. मी कधी विचारही केला नव्हता की, असा चित्रपट करणे हे शौर्याचे पाऊल मानले जाईल. एका अभिनेत्रीच्या रूपात मी केवळ चांगले काम करण्याचा तसेच अशा फिल्म स्क्रप्टिच्या शोधामध्ये धैर्य बाळगण्याचा प्रयत्न केला आहे, जो मला एक खात्रीशीर कलाकार बनण्यात सक्षम ठरतो. यामुळे मला आज स्वत:ला ओळखण्याची जाणीव होत आहे की, मी अशा प्रकारच्या चित्रपटाची निवड केली, ज्याने आपल्या समाजाबद्दल एका महत्त्वपूर्ण चर्चेला सुरुवात केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …