‘चंदिगढ करे आशिकी’ चा ट्रेलर रिलीज

बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना यांचा बहुचर्चित चित्रपट ‘चंदिगढ करे आशिकी’ची चाहत्यांना बऱ्याच काळापासून प्रतिक्षा लागून राहिली आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ‘चंदिगढ करे आशिकी’ चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत वाणी कपूर ही मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा आयुष्मान आपल्या चाहत्यांना हसवताना पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येते की आयुष्मानने या चित्रपटासाठी ना केवळ आपला लूक चेंज केला आहे, तर त्याचबरोबर आपल्या फिटनेसकडेही खूप लक्ष दिले आहे. चित्रपटात त्याची दमदार बॉडी पाहायला मिळत आहे. या चित्रपटात आयुष्मान एका क्रॉस फंक्शनल ॲथलिटच्या भूमिकेत दिसून येणार आहे, तर वाणी कपूर ही एका योगा ट्रेनरच्या रूपात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या १० डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूरने केले असून निर्माता प्रज्ञा कपूर आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …