ठळक बातम्या

घरातील बागेत उगवला ८ किलोचा बटाटा

जगात दररोज वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड बनवले जातात. अलीकडे, न्यूझीलंडमधील एका निवृत्त जोडप्याने आपल्या बागेत एक अनोखा विक्रम केला आहे. वास्तविक या जोडप्याने त्यांच्या बागेतून २-३ किलो नव्हे, तर ७.८ किलोचा बटाटा काढला आहे. असे मानले जाते की, हा जगातील सर्वात मोठा आणि जड बटाटा असू शकतो.
कॉलिन क्रेग-ब्राऊन आणि त्यांची पत्नी डोना क्रेग-ब्राऊन त्यांच्या घराच्या बागेत काम करत होते. त्यांनी त्यांच्या बागेत बटाटे लावले होते. त्यांनी ते बटाटे तयार झाल्यावर जमिनीतून काढायला सुरुवात केली. त्यातील एक बटाटा बराच मोठा असल्याने त्यांना तो थोडा विचित्र वाटला. त्यानंतर वृद्ध दाम्पत्याने मिळून त्या ठिकाणाहून माती काढण्यास सुरुवात केली. एके ठिकाणी बटाटा काढण्याकरिता ते बराच वेळ माती बाजूला सारत होते, परंतु बटाटा अद्याप बाहेर आला नाही. त्याचवेळी, जोडप्याच्या लक्षात आले की, ही काही सामान्य गोष्ट नाही.

हाताने खोदूनही काही काम झाले नाही, तेव्हा या जोडप्याने ती जागा खुराने खोदण्यास सुरुवात केली. शेवटी तपकिरी खडकाचा एक मोठा तुकडा त्यांच्या हातात आला. द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, या जोडप्याला हेदेखील माहीत नव्हते की, त्यांच्या बागेत जगातील सर्वात मोठा बटाटा उगवला आहे. त्याचा तुकडा खाल्ल्यानंतर कॉलिनने पुष्टी केली की, तो बटाटा आहे. बटाट्याचे वजन १७.२ पौंड म्हणजेच ७.८ किलोग्रॅम होते. या अनोख्या बटाट्याची काही छायाचित्रे या जोडप्याने फेसबुकवर शेअर केली आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment

  1. Pingback: magnum research