गौतम गंभीर लखनऊ फ्रँचायजीचा मेंटॉर

नवी दिल्ली – भारताचा माजी सलामी फलंदाज गौतम गंभीरला आयपीएल २०२२ आधी शनिवारी येथे लखनऊ फ्रँचायजीने मेंटॉरच्या रूपात नियुक्त केले. गंभीरने आपल्या नेतृत्वात कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर)साठी दोन आयपीएल जेतेपद जिंकून दिलेत. गंभीर याबाबत म्हणाला की, डॉ. संजीव गोयंका व आरपीएसजी ग्रुपचे आपल्या टीममध्ये अशाप्रकारे शानदार संधी दिल्याबाबत धन्यवाद. ४० वर्षीय गंभीर भारतासाठी ५८ कसोटी, १४७ वनडे व ३७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. तो म्हणाला, सामना जिंकण्याची धमक अद्याप माझ्यात आता ही कायम आहे. संघाला विजेता करण्याची इच्छा २४ तास माझ्या मनात असते. मी ड्रेसिंग रुमसाठी नाही तर उत्तर प्रदेशच्या संघासाठी सामना करेन. या संघाचे नाव अद्याप ठरलेले नाही. या फ्रँचायजीचे मालक संजीव गोयंका यांनी गंभीरचे आरपीएसजी कुटुंबात स्वागत केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …