गोव्यातील नामांकित रेस्टॉरंटमध्ये नेपाळी युवतीवर लैंगिक अत्याचार; दोघांना बेड्या

पणजी – एका नेपाळी युवतीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार गोव्यातील एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी पणजी महिला पोलिसांनी रेस्टॉरंटच्या दोघा कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. पीडित नेपाळी युवती आपल्या मैत्रिणींसोबत गोव्यात फिरायला आली होती.
गोव्यात वाडी शिवोली भागात असलेल्या एका प्रसिद्ध उपहारगृहात नेपाळी युवतीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात रिकेश थापा (३०) आणि प्रधान (३०, दोघेही मूळ रा. नेपाळ) या संशयित कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलिसांनी रस न दाखवल्यामुळे दिल्लीतील सामाजिक संस्थेमार्फत महिला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शनिवार मध्यरात्र ते रविवारी पहाटे दोनच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. पीडित युवती आपल्या दिल्लीस्थित दोघी मैत्रिणींसोबत गोव्याला आली होती. शनिवार १८ डिसेंबरच्या रात्री त्या तिघीही वाडी शिवोली येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्या होत्या. यावेळी दोघाही संशयितांनी पीडितेशी जवळीक साधली. तिला गुंगीचे औषधमिश्रित पेय पाजले. बेशुद्ध झाल्यावर संशयितांनी तिला रेस्टॉरंटच्या बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. दोघांनी तिच्या शरीरावर गंभीर जखमाही केल्या आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …