गोलू बेटा मस्ती नही…

ॲमेझॉन प्राइम व्हिडीओची हिट सीरिज मिर्झापूरचा प्रत्येक सीझन चाहत्यांना खूप आवडला. या सीरिजमधील प्रत्येक कलाकारांची ॲक्टिंग ही अतिशय दमदार असून, या शोमधील गोलू गुप्ताची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. या सीरिजमध्ये गोलू गुप्ताची भूमिका श्वेता त्रिपाठीने साकारली आहे. श्वेता रिअल लाइफमध्ये खूप बोल्ड आहे. अभिनयाबरोबरच ती सोशल प्लॅटफॉर्मवरही ॲक्टिव्ह असते. ती नेहमी आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांची झोप उडवून लावत असते. अलीकडेच श्वेताने एक बोल्ड फोटोशूट केला. या फोटोंमध्ये ती कमालीची बोल्ड दिसत आहे.
श्वेता त्रिपाठीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या बोल्ड फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत आपण पाहू शकता की नेहमी पडद्यावर सिंपल दिसणारी श्वेता यात कमालीची हॉट दिसत आहे. या फोटोंमध्ये श्वेता आपल्या शर्टचे बटन उघडून पोझ देत आहे, तर काही फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा स्कर्ट आणि केवळ ट्यूब टॉप ब्रालेट परिधान केला आहे. त्याचबरोबर तिने लाइट मल्टिकलर शर्टही घातलेला आहे. तिचे कुरळे केस तिच्या लूकला अधिकच सुंदर बनवत आहे. श्वेताचा हा लूक तिच्या चाहत्यांनाही खूप आवडला आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून सातत्याने कमेंट्स येत आहेत. त्यात त्यांनी तिला हॉट व सुंदर म्हटले आहे. एका युझरने तर आपल्या कमेंटमध्ये गोलू बेटा, मस्ती नहीं असेही म्हटले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …