मुंबई- महाविकास आघाडी सरकारविरोधात सातत्याने आंदोलन करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका असून त्यांना विशेष सुरक्षा पुरवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र म्हटलं आहे की, राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका आहे. बहुजनांच्या बाजूने उभेराहिल्यानं यातून दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्यानं हल्ला करत आहेत. सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने पडळकरांच्या गाडीवर हल्ला केला होता तर सांगलीतही पडळकरांच्या गाडीवर तुफान दगडफेक करत प्राणघातक हल्ला झाला होता. गेल्या काही दिवसांपासून पडळकर हेएसटी कामगारांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेनेदाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विरोधक असो वा सत्ताधारी ज्याचा जिवास धोका त्याला संरक्षण दिल पाहिजे आणि म्हणूनच विधान परिषदेचेआमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी, असं फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे. त्यांच्या जीवास काही बर वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जबाबदारी असेल. पडळकरांना तात्काळ सुरक्षा द्या, असं या पत्रात म्हटलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे देखील पत्राद्वारे ही मागणी केली आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …