ठळक बातम्या

गोपनीय अहवाल लिक झाल्याबाबत सीएने मागितली पोलिसांची मदत

मेलबर्न – क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए)चे मुख्य कार्यकारी निक हॉकले म्हणाले की, ‘प्रसिद्ध’ माजी खेळाडूच्या कथीतरित्या मादक पदार्थांचे सेवन केल्याचा गोपनीय अहवाल प्रसारमाध्यमांत लिक झाल्यानंतर आम्ही पोलिसांकडे मदत मागितली आहे. ‘द ऐज’ वर्तमानपत्रात रविवारी प्रकाशित बातमीत सांगण्यात आले की, एक महिला व क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे माजी इंटीग्रिटी प्रमुख सीन कॅरोल यांच्यात फोनवरील चर्चेची रेकॉर्डिंग मिळाली आहे, ज्यात या महिलेने आरोप लावला की, एक खेळाडू कोकेनचा वापर करत असून, बाल्कनीत नग्न होत एका महिलेसोबत नृत्य करत होता. या महिलाने स्वत:ला उच्च श्रेणीचे ‘एस्कॉर्ट’ वर्तवले. हॉकले यांनी माजी खेळाडू निरअपराध असल्याचे सांगितले. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मी रविवारी सकाळीच ती बातमी वाचली. ही बातमी चुकीची आहे. गोपनीय माहिती कोणत्याही प्रकारे चोरने हा गुन्हा आहे. आम्ही पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. आम्ही व्हिक्टोरिया पोलिसांची मदत घेत आहोत. मेलबर्नचे दैनिक समाचाराने बातमीत सांगितले की, रेकॉर्डिंग अनोळखी ई-मेल आयडीवरून आम्हाला पाठवण्यात आली आहे. ही रेकॉर्डिंग लिक करणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा माजी कर्मचारी सांगितले आहे, जो इंटीग्रिटी युनिटचा कमकुवतपणा लोकांसमोर मांडू इच्छितो. कॅरोलने एक वर्षआधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सोडले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …