गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या कार्यालयातील २० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई – राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यालयातील कोरोनाबाधितांची संख्या २० झाली आहे. दरम्यान, यापूर्वी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या २० झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत, तसेच हिवाळी अधिवेशनानंतर देखील अनेक राजकीय नेतेमंडळी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.
कोरोना संसर्ग, रुग्णसंख्या, त्यातील वाढ आणि परिणामांची माहिती घेत खबरदारी म्हणून योग्यवेळी योग्य निर्णय घ्यावा व गरज असेल तर निर्बंध वाढविण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला केल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी सांगितले. लोकांची गर्दी आणि वाढत्या रुग्णसंख्येविषयी चिंता व्यक्त करताना राजकीय व अराजकीय कार्यक्रम थांबविण्याबाबत पवार यांनी बजावल्याचेही सांगण्यात आले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …