ठळक बातम्या

गुलाम नबी आझाद काँग्रेसला देणार सोडचिठ्ठी?

  •  करणार नव्या पक्षाची स्थापना

श्रीनगर – मागील अनेक महिने काँग्रेसमधील नाराजी प्रकर्षाने जाणवत असून, अनेक राज्यांतील नेते मंडळी पक्षातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. पंजाबचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत नवीन पक्ष स्थापन केला. त्यातच आता जम्मू आणि काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नवीन पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात सुरुवात झाली आहे.
गुलाम नबी आझाद काँग्रेसमधील असंतुष्ट जी-२३ गटामधील एक दिग्गज नेते आहेत. जम्मू-काश्मीरमधील पूँछ येथे एका जनसभेला संबोधित करताना २०२४ मध्ये काँग्रेस पक्ष ३०० जागा जिंकताना दिसत नाही, असा दावा त्यांनी केला. दुसरीकडे, आझाद यांच्या जनसभांना होणाऱ्या मोठ्या गर्दीमुळे काँग्रेस पर्यवेक्षक आणि पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काळात गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नवा पक्ष स्थापन केल्यास पक्षातील अधिकतर नेते आझाद यांच्यासोबत जातील. गुलाम नबी आझाद यांच्या जनसभांना होणारी गर्दी वाढत चालली आहे. यामुळे गुलाम नबी आझाद यांचा उत्साह द्विगुणित होत चालला आहे. यातच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा मिळायला हवा, तसेच विधानसभा निवडणुका व्हायला हव्यात, यासाठीच कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे. अनुच्छेद ३७० रद्दबाबत होत असलेल्या टीकेला आझाद यांनी उत्तर दिले आहे, तसेच काहींच्या मते अन्य पक्षांतील अनेक नेते आझाद यांच्याशी संपर्कात असून, आझाद यांनी नवीन पक्ष स्थापन केल्यास ते सर्व नेते आझाद यांच्या नव्या पक्षात सहभागी होऊ शकतात, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …