ठळक बातम्या

गुप्टिलच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत, भारतविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी

शारजाह – अनुभवी सलामी फलंदाज मार्टिन गुप्टील भारतविरुद्ध रविवारी होणाऱ्या सुपर-१२ सामन्यात खेळण्याची शक्यता फार कमी आहे, कारण टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.

गुप्टिलच्या पायाच्या अंगठ्याला हारिस रौफचा चेंडू लागला. पाकिस्तानने मंगळवारी न्यूझीलंडचा ५ विकेटने पराभव केला. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, सामन्यानंतर गुप्टिलला चालताना त्रास होत होता. त्याने सामन्यात २० चेंडूंत १७ धावा केल्या. स्टीड सामन्यानंतर म्हणाले,गुप्टिलला चालताना थोडा त्रास जाणवला व पुढील २४ ते ४८ तास निर्णायक असतील. त्याला पुढील काही तास किती आराम मिळतो, त्याचा आढावा घेऊ. सामना संपल्यानंतर तो थोडा त्रस्त दिसत होता व त्याची स्थिती सांगते की, त्याला यातून सावरायला २४ ते ४८ तास लागतील. जर भारतविरुद्धच्या सामन्यात गुप्टिल खेळत नाही तर न्यूझीलंड संघाला मोठा धक्का असेल, कारण त्यांचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन पायाच्या मांसपेशी ताणल्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. न्यूझीलंडने फर्ग्युसनच्या जागी एडम मिल्नेचा समावेश केलेला. पाकिस्तानचा संघ सुपर-१२ ग्रुप दोनमध्ये सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे, स्टीड म्हणतात की, जर न्यूझीलंडला सेमिफायनलमध्ये क्वालिफाय करायचे असेल तर भारतविरुद्ध रविवारी होणारा सामना खूप महत्त्वाचा असेल. पाकिस्तान आता सेमिफायनलसाठी प्रबळ दावेदार आहे व इतर सर्व दुसऱ्या स्थानासाठी लढत आहेत. त्यामुळे भारतविरुद्धचा सामना महत्त्वाचा असेल. जर आम्ही भारताचा पराभव करतो, तर निश्चित रूपात आम्ही स्वत:ला पटरीवर आणू.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …