गु" />

गुणरत्न सदावर्तेंना जामीन मंजूर; ११५ आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनाही दिलासा

गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे

NCP, Sharad Pawar, Silver Oak Protest, Siver Oak Attack Case, Gunratna Sadavarte, ST Protest,

गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील आंदोलन प्रकरणी अटकेत असलेल्या वकील गुणरत्न सदावर्तेंना दिलासा मिळाला आहे. गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत ११५ आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मुंबई सत्र न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना ५० हजार रुपये रोख हमी आणि तितक्याच रकमेचा हमीदार आणि सर्व ११५ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांच्यासहित अटक करण्यात आलेल्या ११५ एसटी कामगारांच्या जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …