ठळक बातम्या

.गावात बस नाही, म्हणून शाळकरी मुलीनं लिहिलं भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली – एका ८व्या वर्गातील मुलीने भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांना पत्र लिहिल्यानंतर तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील एका गावात बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने बुधवारी यासंदर्भात माहिती जाहीर केली. रंगारेड्डी जिल्ह्यातील मंचल मंडलातील चिदेडु गावातील रहिवासी असलेल्या पी. वैष्णवीने मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिले होते. पत्रात तिने लिहिलं की, तिला आणि तिच्या भावंडांना त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयात जाण्यास त्रास होत आहे, कारण त्यांच्या गावाची बससेवा कोरोनाच्या पहिल्या लाटेत बंद करण्यात आली होती, त्यानंतर अद्याप पुन्हा सुरू झालेली नाही. या १३ वर्षीय मुलीने मूळचे आंध्र प्रदेशचे असलेल्या न्यायाधीश रमणा यांना तेलुगूमध्ये पत्र लिहिले होते.
पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनी, वैष्णवीने लिहिले की, ती आणि तिचा भाऊ पी. प्रवीण, त्याच शाळेतील नवव्या वर्गात शिकतो. तर त्यांची बहीण पी. प्रीती (१५), एका खासगी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. बस बंद असल्यामुळे त्यांना शाळा-कॉलेजपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तिच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि आई एक छोटीशी नोकरी करून त्यांची काळजी घेत आहे. त्यामुळे रिक्षातून त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयाच्या प्रवासासाठी १५० रुपये खर्च येतोय. तो खर्च त्यांना परवडणारा नाही. त्यामुळे बससेवा सुरू करण्यात यावी, असं तिने म्हटलं होतं.

पत्र मिळाल्यानंतर सरन्यायाधीशांनी मुलगी आणि तिच्या भावंडांची स्थिती सरकारी टीएसआरटीसीच्या निदर्शनास आणून दिली. सीजेआयचे सहाय्यक निबंधक-सह-खासगी सचिव, एस. के. राखेजा यांनी टीएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक व्हीसी सज्जनार यांना पत्र पाठवले, त्यामध्ये वैष्णवीने सीजेआयला लिहिलेल्या पत्राची प्रत देखील आहे. शिक्षणाच्या अधिकाराचा सन्मान करण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर बसेस पाठवण्यासाठी आदेश दिल्याबद्दल व्यवस्थापन भारताच्या माननीय सरन्यायाधीशांचे मनापासून आभार मानते, असे ट्विट तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने केले.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …