गहराईयांद्वारे दीपिकाची ओटीटीवर झेप

सरत्या वर्षाला निरोप देता देता अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या चाहत्यांकरिता एक मोठी खबर घेऊन आली आहे. करण जौहर निर्मित आणि शकुन बत्राच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या दीपिकाच्या चित्रपटाला टायटल मिळण्यासोबतच प्रदर्शनाची तारीख आणि प्लॅटफॉर्मही मिळाला आहे, ज्याची घोषणा सोमवारी करण्यात आली. ॲमेझॉन प्राइम व्हिडीओच्या वतीने ‘गहराईयां’च्या विशेष वर्ल्ड प्रीमिअरची घोषणा करण्यात आली. हा शकुन बत्राचा ‘कपूर अँड सन्स’नंतरचा दिग्दर्शकीय प्रयत्न असून, प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून या सिनेमाची प्रतीक्षा होती. ही कलाकृती गुंतागुंतीचे आधुनिक नातेसंबंध, प्रौढता, सोडून देण्याची वृत्ती आणि एखाद्याच्या जीवन मार्गाचे नियंत्रण मिळवण्यावर आधारित नाट्य आहे. जोउस्का फिल्म्ससमवेत धर्मा प्रॉडक्शन्स आणि वायकॉम १८ स्टुडिओजची ही संयुक्त निर्मिती आहे. गहराईयांमध्ये दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य कारवा प्रमुख भूमिकेत असून, सोबत नसिरुद्दीन शहा आणि रजत कपूर महत्त्वाच्या व्यक्तिरेखांत झळकतील. या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमिअर खासकरून ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर २५ जानेवारी २०२२ पासून जगभरात २४० हून अधिक देश आणि प्रदेशांत होतो आहे.
कपूर अँड सन्सच्या बंपर यशानंतर दिग्दर्शक शकुन बत्रा पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत परतले आहेत, ते सांगतात: ‘माझ्याकरिता गहराईयां हा केवळ एक सिनेमा नाही. तो मानवी नात्यांचा वैशिष्ट्यपूर्ण प्रवास आहे, आधुनिक प्रौढ नात्यांचा आरसा आहे, आपण भावना आणि मानसिक आंदोलनातून कसा प्रवास करतो, प्रत्येक पाऊल उचलतो, प्रत्येक निर्णय आपल्या आणि अवतीभोवती असलेल्या व्यक्तींच्या जीवनावर कसा परिणाम करणारा ठरतो हे दर्शवतो. अद्वितीय टीम आणि धर्मा प्रॉडक्शनसमवेत या प्रवासात सामील झाल्याबद्दल विशेष आनंद वाटतो, ही कलाकार मंडळी फार प्रतिभावंत आहे आणि आता ॲमेझॉन प्राइम व्हिडीओची जोड मिळाली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना आपलासा वाटेल असे माझे मत आहे. जगभरातील प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रतिसादाची मला प्रतीक्षा राहील.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …