ठळक बातम्या

गतविजेत्या वेस्ट इंडिजला पराभवाचा दुसरा धक्का

दुबई – एनरिच नॉर्जेच्या नेतृत्वात आपल्या गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर एडेन मार्करमच्या २६ चेंडूंत नाबाद ५१ धावांच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेने टी-२० विश्वचषक सुपर-१२ सत्रातील आपल्या दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजचा मंगळवारी आठ विकेटनं पराभव केला.

त्याआधी एविन लुईसच्या अर्धशतकानंतर वेस्ट इंडिजची फलंदाजी पूर्णपणे ढासळली व ते आठ बाद १४३ धावांच करू शकले. त्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दोन विकेट गमावत व १० चेंडू शिल्लक राखत लक्ष्याचा पाठलाग केला. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब राहिली व पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर कर्णधार तेंबा बावुमाला आंद्रे रसेलने धावचीत केले. त्यानंतर रिजा हँड्रिक्स व रासी वान डेर दुसेनने ५६ धावांची भागीदारी रचली. हेंड्रिक्सने ३० चेंडूंत चार चौकार व एक षटकारच्या मदतीने ३९ धावा केल्या. अकील हुसैनने त्याला शिमरोन हेयमायरकरवी झेलबाद केले. त्यानंतर दुसेनला साथ देण्यास आलेल्या मार्करमने २६ चेंडूंत नाबाद ५१ धावा केल्या, ज्यात दोन चौकार व एका षटकाराचा समावेश होता. दुसेन ५१ चेंडूंत ४३ धावा करत नाबाद राहिला. त्याआधी दक्षिण आफ्रिकेसाठी नॉर्जेने चार षटकांत फक्त १४ धावा देत एक विकेट मिळवला. ड्वेन प्रिटोरियसने तीन व केशव महाराजला दोन विकेट मिळाले. लुईस (५६) व लँडल सिमन्स (१६)ने वेस्ट इंडिजला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी ६३ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी केली, ज्यानंतर वेस्ट इंडिजचे विकेट नियमित अंतरावर पडले. लुईसने सुरुवातीपासूनच आक्रमकता अवलंबलेली. लुईसने दक्षिण आफ्रिकेच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही. त्याने तबरेज शम्सीला डिप स्क्वेअर लेगवर स्लॉग स्वीप खेळत ३२ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक ठोकल्यानंतर तो केशव महाराजच्या गोलंदाजीवर रबाडाला डिप मिडविकेटवर एक सोप्पा झेल देऊन बसला. त्याने आपल्या ३५ चेंडूंत तीन चौकार व सहा षटकार ठोकले. निकोलस पूरन सात चेंडूत १२ धावा करत महाराजचा दुसरा शिकार ठरला. त्यानंतर पुढील षटकात रबाडाने सिमन्सला बाद केले. कर्णधार किरेन पोलार्ड व ख्रिस गेलने १६ व्या षटकात शम्सीला प्रत्येकी एक षटकार ठोकला. गेलने १२ चेंडूंत १२ धावा केल्या व तो ड्वेन प्रिटोरियसच्या चेंडूवर बाद झाला. आंद्रे रसेलला पुढील षटकात नॉर्जेने माघारी पाठवले. पोलार्डने २० चेंडूंत २६ धावा केल्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …