ठळक बातम्या

गडचिरोलीत पुन्हा वाघिणीची शिकार?

  •  नखे, शीर काढून वाघिणीला जमिनीत पुरले

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागात वाघिणीची शिकार झाल्याचे उघड झाले आहे. वाघिणीची शिकार करण्यासाठी उच्चदाब वीज वाहिनीचा वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, वाघिणीचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला, मात्र त्या वाघिणीची नखे आणि शीर नसल्याचे आढळून आले. वाघिणीला लक्ष्य करून ठार मारल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. वनविभागाने पंचनामा केल्यानंतर वाघिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अहेरी वनक्षेत्रात मोसम गावातील वनकक्ष क्र. ६१५ मध्ये ही घटना घडली. या भागात मोठी दुर्गंधी पसरली होती. ही दुर्गंधी पसरण्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न वन कर्मचाऱ्यांनी सुरू केला होता. त्यावेळी ही बाब समोर आली. वन कर्मचाऱ्यांची शोध मोहीम सुरू असताना त्यांना काही वीजतारा आढळून आल्या. घटनास्थळाच्या आसपास ३०० मीटर अंतरावर उच्चदाब वीज वाहिनी आहे. सुमारे १ किलोमीटरची तार वापरून तारजाळे पसरवून ही शिकार केली असल्याचे प्राथमिक पुरावे मिळाले असल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले. वीज प्रवाहाचा धक्का लागून वाघीण मृत झाल्यावर तिला जमिनीत पुरले. मृत वाघिणीची नखे आणि शीर मात्र बेपत्ता आहेत. या वाघिणीचा मृत्यू ७ ते १० दिवस आधीच झाला असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …