गट ‘ड’ची परीक्षा एक पैसाही न घेता पुन्हा घेतली जाणार

आरोग्य भरती परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय
राजेश टोपेंनी केली मोठी घोषणा
मुंबई – बुधवारी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगली खडाजंगी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी परीक्षा घोटाळ्यासंदर्भात अनेक प्रश्न सभागृहात उपस्थित केले होते. यावर आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिले आहे, तसेच आरोग्य भरती परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णयदेखील त्यांनी घेतला आहे.
गट ‘ड’ची परीक्षा पुन्हा घेतली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांची पुन्हा पात्रता परीक्षा घेऊ किंवा नव्या परीक्षा पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. गट ‘ड’ची परीक्षा पुन्हा घ्यायची असल्यास एक पैसा न घेता ती घेतली जाईल, असेदेखील राजेश टोपेंनी सांगितले आहे. यासोबतच कोणत्याही चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाणार नसल्याचे देखील टोपे म्हणाले आहेत.
न्यासा कंपनीला २१ जानेवारी, २०२१ ला अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर ४ मार्च, २०२१ ला उच्च न्यायालयाच्या निर्णयाने पात्र केले. मात्र, चार कंपन्या डावलून न्यासाला काम का देण्यात आले?, असा सवाल फडणवीसांनी केला होता. यावर उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले की, न्यासा कंपनी उच्च न्यायालयात गेली होती. त्यानंतर न्यासाची निवड करण्यात आली. आरोग्य विभागाने पाच लोकांना याविषयी कळवले. पाच कंपन्यांकडून डेमो घेण्यात आला. आरोग्य आयुक्त, सार्वजनिक आरोग्य सचिवांनी परीक्षा घेतली. अ‍ॅप्टेकला ७१, जीए सॉफ्टवेअर ८३, मेटा आयटेकला ७८ आणि न्यासाला ९० गुण होते. असे स्पष्टीकरण राजेश टोपेंनी दिले आहे.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …