ठळक बातम्या

गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाली पूनम पांडे

आपल्या बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत व त्यापेक्षा अधिक वादाच्या भोवऱ्यात अडकणारी अभिनेत्री पूनम पांडे ही आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. पूनमचा नवरा सॅम बॉम्बे याला पोलिसांनी अटक केली आहे. सॅमवर पूनम पांडेला मारहाण केल्याचा आरोप आहे. पूनम पांडेने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी सॅमवर ही कारवाई केली आहे. सॅमने पूनम पांडेला इतकी मारहाण केली आहे की, तिच्यावर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार पूनम पांडे ही गंभीर जखमी आहे. तिच्या डोक्यावर, डोळ्यांवर तसेच चेहऱ्यावर गंभीर जखमा आहेत. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही पहिलीच वेळ नाही आहे, जेव्हा पूनमने सॅमवर मारहाणीचा आरोप केला आहे. यापूर्वीही त्याला पूनमला मारहाण केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. पूनम आणि सॅमने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये लग्न केले होते. विवाहानंतर हे दाम्पत्य हनीमूनकरिता गोव्याला गेले होते. तेथे सॅमने पूनमला मारहाण केली होती. लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांमध्येच पूनमने सॅमविरोधात गोवा पोलिसांकडे मारहाणीची तक्रार केली होती. त्यावेळी पोलिसांनी सॅमला अटकही केली होती. त्यानंतर जेव्हा दोघे मुंबईत परतले, तेव्हा त्यांच्यात तडजोडही झाली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …