ठळक बातम्या

गंगजी जपान टूर स्पर्धेत संयुक्त सहाव्या स्थानी

टोकियो – भारतीय गोल्फर राहिल गंगजी पहिल्या फेरीत ६४ चा स्कोर बनवल्यानंतर दुसऱ्या फेरीत ७२ चे कार्ड मिळवू शकला व तो जपान टूरच्या आयएसपीएस हांडा गास्तुन गोल्फ स्पर्धेत सध्या संयुक्त सहाव्या स्थानी आहे. जपानचा युता इताकेने दोन फेरीत ६५ व ६८ चा स्कोर मिळवला. तो अव्वल स्थानी असलेल्या स्कॉट विन्सेंट (६६-६८) व तोमोया इकामुरा (६८-६६) संयुक्त दुसऱ्या स्थानी आहे. गंगजीचे जपान टूरचे हे चौथे वर्ष आहे व त्याला आपला कार्ड कायम राखण्यासाठी अखेरच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागेल. त्याने पहिल्या फेरीत आठ बर्डी केल्या व या काळात एक बोगी केली. दुसऱ्या फेरीत त्याने सहा बर्डी केल्या, पण या काळात तीन बोगी व दोन डबल बोगी करून बसला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …