गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपिन्सहून भारतात आणले

मुंबई पोलिसांची टीम दिल्लीत दाखल
आॅक्टोबर महिन्यात फिलिपिन्समध्ये करण्यात आली होती अटक
नवी दिल्ली – कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला अखेर भारतात आणले गेले आहे. फिलिपिन्समधून त्याला अटक करण्यात आली आहे. आॅक्टोबर महिन्यात त्याला अटक करण्यात आली होती. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
याशिवाय मुंबई आणि कर्नाटकात तो वसुलीच्या अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांना हवा होता. त्याला भारतात आणले गेल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाकडून देण्यात आलेली आहे. आयबी आणि सीबीआयच्या अधिकाºयांनी पुजारीला दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतले. केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीनंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. मुंबई गुन्हे शाखेची एक टीम पुजारीला ताब्यात घेण्यासाठी अगोदरच दिल्लीत पोहचलेली आहे. मुंबई आणि ठाणे पोलिसांनी जबरदस्ती वसुलीच्या अनेक प्रकरणांनंतर २०१७ आणि २०१८मध्ये त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसदेखील काढली होती.
अधिकाºयाने हे देखील सांगितले की, पुजारी १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून फरार होता आणि आॅक्टोबरमध्ये फिलिपिन्समध्ये त्याला अटक केली गेली होती. त्याच्याविरोधात ठाण्यात जबरदस्ती वसुलीचे २३ गुन्हे दाखल आहेत. सुरेश हा गँगस्टर रवी पुजारीचा जवळचा नातलग आहे आणि २००७ मध्ये त्याच्यापासून तो वेगळा झाला होता. त्यानंतर तो परदेशात पळून गेलेला होता. सुरुवातीच्या काळात त्याने रवी पुजारी आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबत काम केले आणि नंतर त्याने स्वत:ची गँग तयार केली होती.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …