ठळक बातम्या

ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणातले समुद्रकिनारे गजबजले

मुंबई – ख्रिसमस सेलिब्रेशन आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणातले समुद्रकिनारे गजबजले आहेत, तर उत्तर महाराष्ट्रातील शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. मुंबईपासून जवळ असलेले रायगडचे किनारे पर्यटकांचे फेव्हरेट डेस्टिनेशन ठरले आहेत. त्यामुळे नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी रायगडच्या किनाºयांना पसंती दिली आहे. मोठ्या संख्येने पर्यटक येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे किनारे गजबजायला सुरुवात झाली आहे. पर्यटकांच्या आगमनाने स्थानिक व्यावसायिक देखील खूश आहेत.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सहाजिकच कोकणाला देखील मोठ्या प्रमाणात पसंती मिळते, पण यंदा मात्र काही वेगळे पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केल्यास काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक, तर काही ठिकाणी पर्यटकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे चित्र आहे.

कोकणातील एमटीडीसीचे सर्व रिसॉर्ट फुल झाले आहेत, पण रत्नागिरी, गणपतीपुळे या ठिकाणी मात्र पर्यटकांची संख्या तुलनेने कमी आहे. तर दापोली, गुहागर या भागात मात्र पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. एकंदरीत कोकणात यंदा संमिश्र प्रतिसाद दिसून येत आहे.
दरम्यान, नाताळाच्या सुट्टीत साईदर्शनाबरोबरच सरत्या वर्षाला निरोप, तसेच नवीन वर्षाचे स्वागत साईच्या दर्शनाने करण्यासाठी आजपासून गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. शिर्डीत दिवसभरात आॅफलाइन आणि आॅनलाइन पासेसद्वारे केवळ २५ हजार भाविकांना दर्शन दिले जात आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …