ठळक बातम्या

खा.ओवेसींना दंड ठोठावणाऱ्या पोलिसाला पाच हजारांचेबक्षीस

सोलापूर – एमआयएम पक्षाचेअध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी मंगळवारी सोलापुरात आले होते. ते ज्या गाडीत बसून आले होते. त्या लॅन्डरोव्हर गाडीला समोरील बाजूला नंबरप्लेट नव्हती. परंतु मागील बाजूला नंबरप्लेट लावलेली होती. त्यामुळेोसात रस्ता येथील विश्रामगृह येथे त्यांच्या गाडीला २०० रुपयांचा दंड ठोठावला. या पोलीस अधिकाऱ्याला चांगल्या कामगिरीबद्दल सोलापूर आयुक्तांनी पाच हजार रुपयांचंबक्षीस दिले आहे.
मंगळवारी सकाळी ११ वाजता खा. ओवेसी यांचा ताफा सात रस्ता येथील विश्रामगृह येथे दाखल झाला. त्यावेळी तेथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या गाडीला नंबर प्लेट नसल्याचेनिदर्शनास आले. त्यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश चिंदा किंदी यांनी संबंधित गाडीच्या वाहनचालकाकडेनंबर प्लेटची चौकशी केली. तसेच गाडीच्या कागदपत्रांची तपासणी केली. गाडीला नंबर प्लेट बसविल्याशिवाय शासकीय विश्रामगृहा मधून सभेच्या ठिकाणी जाता येणार नाही, असा दम पोलीस प्रशासनानेभरल्यामुळेचालकांनेगाडी मध्येच असलेली नंबर प्लेट त्वरित बसवली. त्यानंतर ओवेसी सभेच्या ठिकाणी पोहोचले. दरम्यान, ओवेसी आलेल्या लॅन्डरोव्हर (वाहन क्रमांक टीएस-११ / ईव्ही-९९२२) या वाहनांवर पुढील बाजूस नंबरप्लेट नसल्यानेसदर चारचाकी वाहनावर केंद्रीय मोटार वाहन कायदयानुसार सीएमव्हीआर कलम ५०/१७७ अन्वयेकारवाईकरत २०० रुपयांचा दंड वसूल केला. मात्र ही गाडी ओवीसी यांच्या नावावर नसून मैनुद्दीन काझी यांच्या नावावर होती. ही कामगिरी पोलीस निरिक्षक वाबळे यांचे समवेत सपोनि चिं.दा.किंदी आणि हवालदार सिरसाट यांनी निपक्षपातीपणेकेली. त्यांच्या चांगल्या कामगिरी बद्दल सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांनी चिं दा.किदी यांना रोख पाच हजार रुपयांचेबक्षीस मंजूर करुन गौरव केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …