खासदारांचे निलंबन : संसदेबाहेर जोरदार आंदोलन

  • जया बच्चन यांचे चॉकलेट आणि आंबा पापडीचे वाटप

नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या बुधवारच्या तिसऱ्या दिवशी देखील लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत गोंधळ पाहण्यास मिळाले. बुधवारीही विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूब केले गेले. त्याचवेळी, विरोधी पक्षाच्या खासदारांच्या निलंबनाबाबत संसदेच्या आवारात विरोधकांचे जोरदार निदर्शने सुरू होती. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संसदेच्या संकुलातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन विरोधकांच्या वतीने करण्यात आले. इतर अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी खासदार जया बच्चन यांनी खासदारांना चॉकलेट टॉफी आणि आंब्याचे पापड (आंबा पापडी)चे वाटप केले. यामुळे आंदोलनाला पाठबळ मिळेल, असे म्हणत जया बच्चन यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला.
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मंगळवारी निदर्शनास आणून दिले होते की, नियम २५६ नुसार खासदारांचे निलंबन त्याच संसदेच्या अधिवेशनात केले जाऊ शकते. संसदेच्या पुढील अधिवेशनात होणारी ही कारवाई पूर्णपणे नियमबाह्य असेल. दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बसणे हास्यास्पद आहे. मी विरोधी खासदारांना विनंती करतो की, किमान पश्चाताप तरी करावा. आम्ही लोकसभा चालवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. विरोधकांची भूमिका काय आहे, ते पाहू. आम्हाला लोकसभा चालवायची आहे, असेही जोशी म्हणाले. दुसरीकडे, १२ खासदारांच्या निलंबनाव्यतिरिक्त, विरोधी पक्षासोबत संसदेत कोणतीही चर्चा न करता तीन कृषी विधेयके परत घेण्यात आल्याचाही विरोधकांच्या वतीने निषेध करण्यात आला. विधेयक मंजूर करण्यापूर्वी एमएसपी, ७०० आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू इत्यादी अनेक विषयांचा विचार केला गेला नाही आणि त्यावर चर्चा झाली नाही, असा आरोपही यावेळी विरोधकांनी लावला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …