मुंबई – आधी कोरोना महामारी आणि त्यानंतर झालेली महागाई याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसला आहे, पण आता रेस्टॉरंटमध्ये जाऊन चमचमीत खाद्य पदार्थांचा आस्वाद घेणाऱ्या खवय्यांनाही जोरदार दणका बसणार आहे. राज्यातील रेस्टॉरंटमधील सर्व खाद्य पदार्थांचे दर तब्बल ३० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्रातील रेस्टॉरंट मालक संघटनेच्या (आहार) विचाराधीन असल्याचे बोलले जात आहे.
कांदा, भाज्या, खाद्यतेल यांसह इतर वस्तूंच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे, तसेच १९ किलोग्रॅम वजनाच्या एलपीजी सिलिंडर दरात गेल्या वर्षभरात ५०० रुपयांहून अधिक वाढ झालेली आहे. यामुळे हॉटेल-रेस्टॉरंट चालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
कोरोना काळाआधी प्रत्येक सहा महिन्यांनंतर रेस्टॉरंट चालक स्थानिक पातळीवर किमतीचा आढावा घेत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांत कोरोना आणि लॉकडाऊन कारणास्तव हा आढावा घेण्यात आला नाही. याउलट बहुतांश काळ व्यवसाय बंद असल्याने खर्चात वाढ झाली आहे. त्यातच उत्पन्नात प्रचंड घट झालेली आहे. म्हणूनच नुकसान भरून काढताना व्यवसायात तग धरून राहण्यासाठी पदार्थांच्या किमतीत वाढ करण्यावाचून दुसरा पर्याय नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …